बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबने हातातला सामना गमावला, राजस्थानचा रोमांचक विजय

नवी दिल्ली | आयपीएलच्या तिसऱ्या हंगामाला सुरूवात झाली आहे. आयपीएल म्हंटलं की रोमांच येतोच. पंजाब किंग्ज आणि राजस्थान राॅयल्स यांच्यातील सामना जोरदार रंगतदार झाला. राजस्थान राॅयल्स संघानं 185 धावांचं लक्ष्य पंजाबसमोर ठेवलं होतं. पण अखेरच्या षटकात पंजाबने सामना 2 धावांनी गमावला आहे.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान राॅयल्स संघाने 185 धावांचा डोंगर उभा केला. राजस्थान राॅयल्स कडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने जोरदार फटकेबाजी केली. तर इविन लुईस आणि महिपाल यांच्या आक्रमक फलंदाजीने राजस्थान संघाने 185 धावसंख्या केली. प्रत्युत्तरात पंजाब संघाची सुरूवात खूप आक्रमक झाली. पंजाबचा कर्णधार केएल राहूल आणि मयांक अग्रवाल यांनी शतकी सलामी दिली.

केएल राहूल 49 धावांवर तर मयंक आग्रवाल 67 धावांवर बाद झाल्यावर मात्र पंजाब संघाची फलंदाजी ढेपाळली. अॅडम मार्करम आणि नकोलस पुरन यांनी शेवटपर्यंत फलंदाजी केली पण शेवटच्या शटकात पंजाबला फटका बसला. राजस्थानकडून शेवटचं षटक युवा गोलंदाज कार्तीक त्यागी याने टाकलं आणि पंजाबचा विजय हिरावून घेतला.

कार्तीक त्यागी 4 धावा वाचवण्यासाठी शेवटचं षटक टाकत होता. त्याच्या पुढे जगातील सर्वात धोकादायक फलंदाज निकोलस पुरन होता. पण त्यागीच्या अप्रतिम गोलंदाजीनं पंजाबला केवळ 2 धावा काढता आल्या आणि पंजाबचा 2 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला.

थोडक्यात बातम्या 

तालिबानी सत्तासंघर्ष टोकाला, दोन्ही सर्वोच्च नेेते गायब

…मग राज्यपालांना एवढा अधिकार नाही का?- चंद्रकांत पाटील

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची घेणार भेेट!

भाजपच्या ‘त्या’ 12 निलंबित आमदारांना निवडणुक आयोगाचा मोठा दिलासा

“राज्यपालांच्या डोक्यावरील टोपी ही विद्वत्तेची, त्यांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More