बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यावर राजस्थान राॅयलचं मजेशीर ट्विट

मुंबई | आयपीएल इतिहासातील सर्वात रोमांचक आणि श्वास रोखून ठेवणारा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात झाला होता. हा सामना आयपीएलच्या 14 व्या हंगामात झाला होता. निडर होऊन मैदानात आलेल्या अजिंक्य तारेने षटकार खेचत मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये पोहचवलं होतं. या सामन्यात 15 व्या षटकात 195 धावांचं आव्हान मुंबईने पुर्ण केलं होतं. त्यानंतर आजिंक्य तारेनं आपल्या खास अंदाजात जर्सी तोंडावर घेऊन सेलिब्रेशन केलं होतं. या सामन्याला आता 7 वर्ष पुर्ण झालं आहे. या सामन्यावर मुंबई इंडियन्सने एक ट्विट केलं होतं.

मुंबई इंडियन्सच्या या ट्विटवर राजस्थान राॅयल्सने मजेशीर प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत त्या सामन्याची आठवण काढली. ‘कधीही हार मानता कामा नये. 7 वर्षांपूर्वी एक बॉल बाऊंड्री लाईननच्या पार गेला. तरे नॉर्थ स्टँडच्या दिशेनं पळाला आणि संपूर्ण वानखेडे स्टेडियम सेलिब्रेशन करत होते’, असं ट्विट मुंबई इंडियन्सनं केलं. या ट्विटला राजस्थान राॅयल्सने रिट्विट केलं आणि त्यावर मीमचा एक फोटो शेअर केला. ‘हा भाई पता है’, असं मजेशीर वाक्य त्या फोटोवर लिहिलं.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान राॅयल्स यांच्यातला हा अतीतटीचा सामना होता. राजस्थान जिंंकली तर राजस्थान प्लेऑफला पोहोचणार होती. तर मुंबईला प्लेऑफसाठी 14.3 षटकात राजस्थानने दिलेलं आव्हान पुर्ण करायचं होतं. अॅडरसनने या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. अखेरच्या दोन चेंडूवर मुंबईला 8 धावांची गरज होती. रायडूने षटकार खेचत मुंबईला सामन्यात परत आणलं. अखेरच्या चेंडूवर 2 धावाची गरज असताना दुसरी धाव घेण्याच्या नादात रायडू बाद झाला होता. आता सामना ड्राॅ झाला होता.

दरम्यान, आता काय करावं हा प्रश्न अंपायरला देखील पडला होता. मुंबईला एक चेंडू टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तो चेंडू मुंबईला सीमेपलिकडे पोहचवायचा होता. अजिंक्य तारेने त्या चेंडूवर जबरदस्त षटकार खेचला आणि मुंबई अखेर प्लेऑफ मध्ये पोहोचली होती. त्यानंतर आजिंक्य तारेनं आपल्या खास अंदाजात जर्सी तोंडावर घेऊन सेलिब्रेशन केलं होतं.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार?

‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ

कोरोनाची लस जगात सर्वात आधी घेणाऱ्या ‘विल्यम शेक्सपिअर’चा मृत्यू

माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, त्यानंतर तिने जे केलं त्याने सर्वच हादरले

खळबळजनक! शौचालयासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर गँगरेप, खांबाला लटकवलं अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More