दौसा | ज्याच्या एका फुत्कारानं अंग थरथर कापायला लागतं अशा कोब्रा सोबत एक तरुण मनसोक्त गप्पा मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजस्थानातील जयपूरमधील दौसा गावातील तरूण मद्यधुंद अवस्थेत सापाची रस्ता अडवून त्याच्याशी मस्ती करत होता.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणानं कोब्र्याची वाट अडवली. त्यानंतर अर्धा तास सापाला पकडून त्याच्यासोबत वेगवेगळ्या कसरती करू लागला. सापाशी गप्पा मारताना म्हणाला, आज तुला सोडणार नाही, येना आपण सोबत खेळूयात. तुला असाच जाऊ देणार नाही. या गप्पा मारताना सापाला त्यानं गळ्यातही माळेप्रमाणे घातलं आणि सापाला आपल्या कपड्यातही त्याने ठेवलं.
अर्धा ते पाऊण तासाच्या या जीवघेण्या खेळात चिडलेल्या सापानं नशेत असलेल्या तरुणाला अनेक ठिकाणी दंश केला होता. तरुणाच्या शरीरात विश पसरल्यामुळे शरीर काळं निळ पडत होतं. तरीही सापाला सोडण्यास तरुण तयार नव्हता.
दरम्यान, अखेर दोन स्थानिक तरुणांनी मद्यधुंद तरुणासा सापापासून वेगळं केलं आणि रुग्णालयता उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याचा प्रकृतिबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र त्या तरूणाची व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नशा शराब में होता तो नाचती बोतल… pic.twitter.com/9Vp9wk4eaZ
— anuragamitabh انوراگ امیتابھ अनुरागअमिताभ (@anuragamitabh) January 4, 2020
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल- https://t.co/CWknzhOk1D @AdvYashomatiINC @KiritSomaiya
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
…तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन; बच्चू कडूंचा इशारा-https://t.co/vvKBBsKSVi @RealBacchuKadu @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
रात्री लक्ष्मी आली तर नाही म्हणू नका; या काँग्रेस मंत्र्याचा मतदारांना सल्ला- https://t.co/q6MDdLzsqE @AdvYashomatiINC
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
Comments are closed.