नवी दिल्ली | राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थ दिलं आहे. त्यासोबतच त्यांनी भारत बंदलाही यांनी जाहीरपणे पाठींबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी काँग्रेस कुटूंबासह गेहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब पार्टटाईम राजकारण करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही शेतकऱ्यांचं काहीही पडलेलं नसल्याचं सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला खरंच शेतकऱ्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी आधी राजस्थानमधील शेतकऱ्यांची दखल घ्यावी. राजस्थानातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार या प्रश्नाचं उत्तरही अशोक गेहलोत देत नसल्याचं पुनिया म्हणाले.
दरम्यान, जर गेहलोत खरोखरच शेतकऱ्यांचे हितचिंतक असतील तर त्यांनी राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे, असंही पुनिया यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही”
शेतकऱ्यांचं आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचं वाटतं- अनुपम खेर
“नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही”
शेतकऱ्यांचा उद्या ‘हिंदुस्थान बंद’चा इशारा!
सिनेसृष्टीला धक्का! कोरोनामुळे ‘या’ अभिनेत्रीला गमवावा लागला आपला जीव