मुंबई | कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच महाराष्ट्राच्या राजभवनात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. राजभवनातील तब्बल 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राजभवनाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
राजभवनातील 100 लोकांची चाचणी केली गेली होती. त्यातील 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यांना आता उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तब्येत उत्तम असून त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वत:चं विलगीकरण करून घेतलं आहे. त्यांनी विलगीकरण केल्याने येत्या काही दिवसांत ते कोणासही भेटण्यास उपलब्ध होणार नाहीत.
दरम्यान, संपूर्ण कोरोनाच्या काळात राजभवनावर नेत्यांची रीघ लागली होती, प्रामुख्याने सरकारच्या तक्रारी घेऊन विरोधी पक्ष असलेला भाजप आणि भाजपच्या नेत्यांनी राजभवनावर खेटे घातले होते. तसंच या काळात राजभवनावर इतरही अनेकांची वर्दळ होती.
महत्त्वाच्या बातम्या-
अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रेखा यांचा बंगला सील!
अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिषेकचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…
शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-
चीनच्या भारत विरोधी नव्या डावपेचांचा शरद पवारांकडून उलगडा, म्हणाले…
परवा गलवान खोऱ्यामध्ये बंदूक वापरली नाही ‘तो’ आम्ही केलेल्या कराराचा भाग- शरद पवार
आपले शेजारी आपल्याच विरोधात, बिघडलेले संबंध अलीकडच्या काळातील योगदान; पवारांचा हल्लाबोल
“मला मोदींचा गुरू म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका”
या देशाची अर्थव्यवस्था वाचवायला मनमोहन सिंगांसारख्या व्यक्तीची गरज- शरद पवार
केंद्राने आपलं दुकान चालवण्यासाठी….., शरद पवार यांचं रोखठोक मत
मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप, म्हणाले, आमचा विद्यार्थी पास झालाय!
Comments are closed.