छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (कर्जमाफी) योजनेत कोट्यवधींचा घोटाळा!

मुंबई | छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्जमाफीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हे आरोप केलेत. 

शेतकरी कर्जमाफीचे काम महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला देण्याचं भासवण्यात आलंय. प्रत्यक्षात हे काम मागच्या दारानं नागपूरच्या कंपनीला देण्यात आलं असून त्यांनी हा घोटाळा केलाय, असा दावा राजू शेट्टी यांनी केलाय. 

तर कर्जमाफीसाठी डिजिटल कंत्राट देताना निविदा काढली होती का? मर्जीतल्या कंपनीला कंत्राट मिळवून देणारा कौस्तुभ धवसे कोण? मुख्यमंत्र्यांचा ओएसडी म्हणून त्याची नेमणूक दलाली घेण्यासाठी केलीय का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारलाय.