कोल्हापूर महाराष्ट्र

नरेंद्र मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये- राजू शेट्टी

कोल्हापूर | केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे. पण सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये. तसेच नरेंद्र मोदी यांनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांना कायदेशीर ग्वाही दिली पाहिजे. सर्वस्तरातील लोक दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांना डिवचू नये. केंद्र सरकारचे लक्षण ठिक दिसत नाही. त्यांना हे आंदोलन मोडीत काढायचं आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांनी दिल्लीच्या चारही बाजूंना वेढा घातला आहे. लाखो शेतकरी हजारो वाहने घेऊन दिल्लीत आले आहेत. त्यांची दिल्लीतून परत जाण्याची मानसिकता नाही, असं राजू शेट्टींनी सांगितलं.

हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाच्या किंवा संघटनेच्या हातात राहिलेलं नाही. शेतकऱ्यांचा हा रोष कमी करायचा असेल तर कृषी कायदे मागे घेतले पाहिजे, असं शेट्टी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“कोरोनामुळे संसदेचे अधिवेशन रद्द करणाऱ्या मोदींना कितवं आश्चर्य म्हणणार?”

हृतिक, एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील- कंगणा राणावत

“फुटकळ चर्चेसाठी सरकारकडे वेळ आहे, पण मराठा आरक्षणावर चर्चा करायला वेळ नाही”

‘या’ तारखेपासून सर्वसामान्यांसाठी सुरु होणार लोकल सेवा; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

पृथ्वी शॉच्या अफलातून लेग स्पिनने सर्वांना झाली शेन वॉर्नची आठवण; पाहा व्हिडीओ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या