बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाळासाहेब थोरातांकडून घटनाबाह्यरितीने काम’; ‘या’ शिवसेना खासदाराचा थोरातांवर गंभीर आरोप

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार राजेंद्र गावित यांनी पालघरमध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

महाराष्ट्रात आदिवासी जमीन बंदी हस्तांतरणाचा कायदा आहे. पण तरीही राज्यात मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासींवर होत आहे. या सर्व गोष्टींना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात परवानगी देत आहे, असा आरोप राजेंद्र गावित यांनी केला आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या सर्व प्रकरणांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तपासणी करुन योग्य ती करवाई करावी, अशी मागणी राजेंद्र गावित यांनी केली आहे.

मुंबई, ठाणे, पनवेल भागात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाची जमिनींना मागणी वाढली आहे. महसूल मंत्री थोरात घटनाबाह्यरितीने काम करत आहेत. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना अशा प्रकारच्या परवानग्या दिल्या जात नव्हत्या, असं म्हणत राजेंद्र गावित यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुढील दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक!

तपासाला सहकार्य करणाऱ्या खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल !

पोटात चाकू खुपसून बायकोने केली नवऱ्याची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

पुण्याच्या ‘वॉरीयर आजी’चा दिल्लीत सत्कार; आजींना पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ

शिवसेनेकडून व्हिप जारी; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More