अरविंद शाळीग्राम यांच्याकडे दिलेला पुणे विद्यापीठाच्या परिक्षा नियंत्रक पदाचा कार्यभार रद्द करा- राजेंद्र विखे
पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापुंढे परिक्षांचं नियोजन करण्याचं आव्हान असताना परिक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे लॉकडाऊनमुळे गावी अडकून पडले. यानंतर या विभागाचा कारभार डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे देण्यात आलाय.
डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे देण्यात आलेला कारभार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी प्रवरा विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी केली आहे. राजेंद्र विखेंनी या संदर्भात एक पत्र लिहिलं आहे.
अरविंद शाळीग्राम हे एक सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. तरी ही विद्यापीठ प्रशासनाचा कारभार त्यांनाच देण्याचा आग्रह का?, असा सवाल राजेंद्र विखे यांनी उपस्थित केला आहे.
कोणत्याही पदाचा तात्पुरता कार्यभार डॉ. अरविंद शाळीग्राम यांनाचा का देण्यात येतो? हे सगळं संशयास्पद आहे असं वाटतं, असं राजेंद्र विखे यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक
टोमॅटोमध्ये व्हायरस शिरल्याची अफवा, विश्वास ठेवू नका!
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांवरील निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
आमदार धीरज विलासराव देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर; खते बियाणे पुरवठा योजनेचा शुभारंभ
तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता?; राहुल गांधी म्हणतात…
Comments are closed.