बोटे घेऊन जा; नायर रुग्णालयाचा असंवेदनशीलपणा…

मुंबई | एमआरआय मशिनमध्ये खेचला गेल्यामुळे मृत्यू झालेल्या राजेश मारु यांच्या कुटुंबियांना नायर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय आला. हाताची तुटलेली बोटे घेऊन जाण्यासाठी रुग्णालयातून फोन आल्याने त्यांना धक्का बसलाय. 

रुग्णालयाच्या चुकीमुळे मारु कुटुंबियांना राजेशला गमवावं लागलं. अत्यंविधीवेळी बोटांची मागणी करुनही रुग्णालयानं बोटं दिली नाहीत. आता अत्यसंस्कार होऊन 2 आठवड्यांचा कालावधी उलटलाय. त्यानंतर बोटे नेण्यासाठी रुग्णालयाकडून फोन करण्यात आला. 

राजेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत, तोच रुग्णालयाकडून अशाप्रकारे असंवेदनशीलता दाखवण्यात आल्याने चीड आल्याचं मारु कुटुंबियांचं म्हणणं आहे.