अहमदनगर जिल्हा रुग्णालयात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना राजेश टोपेंनी केली मदत जाहीर
अहमदनगर | अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात आग लागून 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रुग्णालयात अचानक लागलेल्या आगीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ स्वरूपात मदत जाहीर केली आहे.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अचानक आग लागल्याने एकच खळबळ माजली होती. तसेच या आगीत मृत्युमुखी पडलेल्या कोरोना रुग्णांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करत 5 लाख रुपयांची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आतापर्यंत या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचवण्यात आलं आहे.
मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असल्याचं राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटलं आहे. तसेच जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना राजेश टोपे यांनी व्यक्त केल्या आहेत.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! अनिल देशमुखांना पीएमएलए न्यायालयाचा दणका
सचिन वाझेच्या अडचणी वाढल्या; ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत वाढ
अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयात आग, 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू
मोहित कंबोज यांच्या ओरोपांवर नवाब मलिकांनी सोडलं मौन, म्हणाले…
‘समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं’; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप
Comments are closed.