बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मनापासून माफी मागतो’; राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी

मुंबई | आरोग्य विभागातील पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण हॉल तिकिटात संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ घातल्याचं समोर आलं होतं. हॉल तिकीटमध्ये अनेक चुका समोर आल्या होत्या. त्यामुळे अखेर आरोग्य विभागाकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेला राज्यभरातून मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले आहेत. परिणामी परीक्षा पुढे ढकलण्यानं सर्व विद्यार्थी आता गोंधळात पडले आहेत. तसेच अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत.

आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिक्षार्थींची माफी मागितली.

दरम्यान, परीक्षेची जबाबदारी ‘न्यासा’ची असताना देखील त्यांना टार्गेट देऊनही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली नाही. सेलूतील काही परीक्षा केंद्राना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गरजेत त्रुटी आढळून आल्या, असंही टोपे यांनी सांगितलं. तसेच ठल्याही परिक्षार्थींची गैरसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

…तरच जीएसटीच्या कक्षेत येणार पेट्रोल आणि डिझेल- निर्मला सितारामन

“पालकांनो तुमचा मुलगा मुलगी काय करते याकडे लक्ष द्या”

कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

राजकारणात अशा घटनांमुळे चुकीचा पायंडा पडतोय, हे अत्यंत डिस्गस्टिंग आहे- पंकजा मुंडे

मोठी बातमी! आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली; विद्यार्थी संभ्रमात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More