महाराष्ट्र मुंबई

“कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, आता जास्त काळजी घ्यावी लागेल”

मुंबई | UKमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवा अवतार हा अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे आपल्यालाही आता जास्त काळजी घ्यावी लागेल, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

कोरोना विषाणूचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य असला तरी आपण सध्या देत असलेली औषधं आणि निर्माण होत असलेल्या कोरोना लस या त्या विषाणूवर परिणामकारक असल्याचा दावा राजेश टोपे यांनी केलाय.

कोरोनाबाबत सरकारने घालून दिलेले नियम पाळणं अधिक गजरेचं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि नाताळ, तसंच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लावलेल्या रात्रीच्या संचारबंदीला चांगला प्रतिसाद असल्याचं टोपे म्हणाले.

मकडून लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मागण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत बायोटेककडूनही केंद्र सरकारकडे परवानगी मागवली आहे. त्यामुळे आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. त्यांनी ठरवायचं आहे की कोणत्या तारखेला लसीकरणाला सुरुवात करायची, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश राजकीय हेतूने- चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला!

कोरोनाच्या आणखी एका प्रकारानं ब्रिटनमध्ये हाहाकार!

मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने घेतला हा मोठा निर्णय!

“जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या