मुंबई | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईसह राज्यात महिलांसाठी आता फिरता दवाखाना दिसेल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
फिरत्या दावाखान्याचं उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.
महिलांना घरातून रुग्णालयात आणणं त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणं यासाठी या फिरत्या दवाखान्याची सुविधा असणार आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्याला दोन – दोन फिरते दवाखाने असणार आहेत. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये या फिरत्या दवाखान्याची अधिक वाढ केली जाणार आहे. याचा चांगला परिणाम होईल, असं राजेश टोपेंनी सांगितलं.
थोेडक्यात बातम्या-
‘भाजपनं आधीच सुधीर मुनगंटीवारांकडं जबाबदारी दिली असती तर…”
भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या- रूपाली चाकणकर
“…तर मग देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”
…अन् पाणी समजून त्या सरकारी अधिकाऱ्यानं प्यायलं सॅनिटायझर!
…अन्यथा 40 लाख ट्रॅक्टर रस्त्यावर उतरवणार; शेतकरी नेत्याचा मोदींना इशारा