बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय शरद पवारच घेतील”

मुंबई | सचिन वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची वर्णी लावण्यात आली आहे. मात्र यासोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून हटवून त्यांच्या जागी आरोेग्यमंत्री राजेश टोप यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. अशातच यावर राजेश टोपेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय पवार साहेबच घेतील. मात्र गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार आहे. त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळच येणार नसल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

सचिन वाझे प्रकरणावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची नाव आघाडीवर होतीत. मात्र टोपेंनी यावर प्रतिक्रिया देत या चर्चांणा पुर्णविराम दिला आहे.

दरम्यान, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश शेठ यांच्यकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली झाली असून हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त असणार आहेत. त्यासोबतच संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

‘…जबाबदार वाझे’; मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणावर अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

‘मी बंगळुरू सोडलं नाही’; हितेशा चंद्राणीचं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्टीकरण!

“तुम्हाला जर फाटकी जीन्स घालायची असेल तर कूल दिसा भिकाऱ्यासारखं नाही”

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More