बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात कोरोनाचे नवे variant आढळल्यानंतर राजेश टोपेंनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह काही राज्यात कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. कोरोना कमी झाला असं वाटत असतानाच गेल्या आठवड्यापासून मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्येत देखील वाढ पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona Variant) आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळले असले तरी ते ओमिक्रॉनचाच (Omicron) भाग असल्याचं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. तर यामुळे घाबरून न जाण्याचं आवाहन देखील राजेश टोपेंनी केलं.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार का? असा सवाल उपस्थित होत असताना राजेश टोपेंनी याबद्दल देखील स्पष्टिकरण दिलं आहे. मास्कमुक्ती झालेली नाही, मात्र मास्कसक्ती आपण अद्याप लागू केलेली नाही. ती करावी का याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेतील, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी विविध राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी यात महाराष्ट्रातील रूग्णसंख्या आणि कोरोना टेस्टिंगबाबत देखील चर्चा झाली. तर कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता राजेश टोपेंनी जनतेला काळजी घेण्याचं आणि दुर्लक्ष न करण्याचं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

रशियाच्या इशाऱ्याला अमेरिकेकडून केराची टोपली, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

“आज्जींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे, पण आमच्यासाठी नाही”

राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, बाळा नांदगावकर म्हणतात…

बहुप्रतिक्षित KGF 3 कधी येणार?; रॉकी भाई म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More