आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना राजेश टोपेंनी दिला हा कानमंत्र; म्हणाले…
मुंबई | राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी उद्या म्हणजेच रविवारी 28 फेब्रुवारीला अनेक जिल्ह्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेआधी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी परीक्षार्थींना कानमंत्र देत त्यांचा धीर वाढवला आहे. यासदंर्भात राजेश टोपे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. तर ट्विट करत एक पत्रही शेअर केलं आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येणार आहे. त्यामुळे फक्त गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने जाहिरात काढून परीक्षेची भरतीप्रक्रिया राबवली. त्यानुसार उद्या रविवार 28 फेब्रुवारी रोजी राज्यभरात 5 हजार जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे.
दरम्यान, या भरतीप्रक्रियेत उमेदवारांना दोन पदांसाठी अर्ज करता येईल, असेदेखील आरोग्य विभागाने सांगितले त्यानुसार उमेदवारांनी दोन पर्यायांची निवड केली. दोन्ही परीक्षा 28 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या असून दोन्ही पदांच्या परीक्षेच्या वेळा, उमेदवारांचे नाव, बैठक क्रमांक सारखे देण्यात आलं आहेत. मात्र परीक्षा केंद्र दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. एकाच वेळी दोन ठिकाणी परीक्षा देणे शक्य नसल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्तपदे भरण्यासाठी उद्या दि.२८ फेब्रुवारी रोजी राज्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना माझ्या शुभेच्छा!https://t.co/XtszC1FTuW
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 27, 2021
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी
“चुकीचं काम केल्यास शिक्षा व्हायलाचं हवी, मगं चुकी करणारे उदयनराजे का असेना”
‘राज ठाकरेंना कोरोना झाला तर…’; ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची राज यांच्यावर टीका
‘द चॅनेल 1’नं मारली बाजी; मराठी भाषेतलं पहिलं ओटीटी व्यासपीठ सुर
प्रशासनातील जुन्या जाणत्या अधिकाऱ्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी
Comments are closed.