Top News अहमदनगर महाराष्ट्र

पार्थ समंजस आहे, सगळं काही सुरळीत होईल; या बड्या नेत्याचं वक्तव्य

अहमदनगर |  पवार कुटुबांत सध्या पार्थ प्रकरणावरून चलबिचल सुरू आहे. अशात पार्थ पवार समंजस आहे. त्यामुळे सगळं काही सुरळित होईल, असं महत्त्वाचं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. (Rajesh Tope Statement On Parth Pawar)

पार्थ माझा जवळचा मित्र आहे. तसंच तो फार समंजस आहे. तसंच मी देखील या विषयावर त्यांच्याशी बोलणार आहे. मला माहितीये की पवार कुटुंबियांमध्ये सगळं काही सुरळित होईल, असं राजेश टोपे म्हणाले. (Rajesh Tope Statement On Parth Pawar)

छोट्या मोठ्या गोष्टीतून काही घडले तरी त्या तिथल्या तिथे दुरुस्त करण्याची व्यवस्था शरद पवार यांच्या कुटुंबात आहे, असंही टोपे म्हणाले. (Rajesh Tope Statement On Parth Pawar) पवार कुटुंबातले सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात. मग ते पवार साहेबांचे भाऊ, पुतणे, नातू असतील किंवा तिसरी पिढी… सगळे कर्तृत्ववान आहेत. सर्वजण एकीने काम करतात. छोट्या मोठ्या गोष्टीतून काही घडले, तरी ते तिथल्या तिथे दुरुस्त करण्याची व्यवस्थाही या कुटुंबात आहे, असं ते म्हणाले.

पवार कुटुंब आदर्श कुटुंब आहे. या कुटुंबापासून अनेक जण धडा घेतात. त्यामुळे एवढ्या छोट्याशा प्रकार व्यवस्थित व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. (Rajesh Tope Statement On Parth Pawar)

महत्त्वाच्या बातम्या-

मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?, मी सरकारशी बोलतो- राज ठाकरे

डाॅ. राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

“आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या