Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र सोलापूर

…म्हणून नागपुर, मालेगाव आणि धारावीतला कोरोना आटोक्यात, राजेश टोपेंचा महत्त्वाचा खुलासा

सोलापूर | शहरात काटेकोर सर्वेक्षण करुन कोरोनाची लागण झाल्याची शंका असणाऱ्या आणि कोमॉर्बिड नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिल्या.

नागपूर, मालेगाव, धारावी येथे संस्थात्मक अलगीकरण केल्यामुळेच तेथील कोरोना प्रसाराचे प्रमाण कमी झाले आहे, अशा महत्त्वाचा खुलासा आरोग्यमंत्र्यांनी सोलापुरात बोलताना केला.

त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील दाट वस्ती असलेल्या भागातील सर्व्हेक्षण करा, सर्व्हेक्षणात संशयित वाटणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करा. इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये त्या नागरिकांना चांगला आहार द्या. तेथील वातावरण प्रसन्न ठेवा, त्यांचे समुपदेशन करा, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

सोलापूर शहरातील कोरोना प्रसार थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत श्री.टोपे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली.  गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री तथा राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ उपस्थित होते.

ट्रेंडिंग बातम्या-

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, हा बडा नेता पुन्हा दिल्लीत!

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली- गृहमंत्री अनिल देशमुख

गुन्हे सिद्ध करण्यात लॅबचे महत्वपूर्ण योगदान, गृहमंत्री अनिल देशमुखांचे कौतुकोद्गार

रूग्णसंख्या कमालीची वाढतीये मात्र ‘ही’ गोष्ट राज्याच्या दृष्टीने सकारात्मक घडतीये- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या