मुंबई | जगभरात आकांडतांडव घालणारा कोरोना व्हायरस आता कमी प्रमाणात होत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र अजुनही लोकांच्या मनात कोरोना घर करून बसला आहे. कोरोना चाचणी म्हटलं की तरी काळीज घाबरतं. त्यात चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा लुबाडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर येत होत्या. अशातच आरोग्यमंत्र्यांनी चाचणीच्या दरात 200 रूपयांनी कपात केली आहे.
राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आलं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान,कोरोना चाचणीच्या दरात चौथ्यांदा घट करण्यात आली आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट केली असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे- ना. @rajeshtope11 pic.twitter.com/PC41iRs3TB
— NCP (@NCPspeaks) October 26, 2020
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?- नारायण राणे
बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून गप्प बसलोय, आमच्याकडे नजर फिरवू नका नाहीतर…- नारायण राणे
“सुशांतची केस अजून संपलेली नाही, आदित्य ठाकरे खुनाच्या आरोपाखाली गजाआड जाणार”
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार?
“उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही”
Comments are closed.