बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता, पण…- राजेश टोपे

मुंबई | राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळं 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. लसींचे डोस अपुरे असल्यामुळे आणि नव्या डोसचा पुरवठा देखील पुरेसा नसल्यामुळं राज्यात 18 ते 44 वयोगटामध्ये लसीकरण सुरू करता येणार नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. मात्र, आज बोलताना राजेश टोपे यांनी 1 मे पासून म्हणजेच शनिवारपासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

1 मे ला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरुवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. त्यामुळं ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

आम्ही सिरम इन्टिट्यूटला पत्र लिहिलं होतं. त्यांनी सांगितलं मे महिन्यात 13 ते 14 लाख लसीचे डोस देऊ. भारत बायोटेक कोवॅक्सिनचे चार ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. दोघांची बेरीज 18 लाखांपर्यंत जाईल. त्यादृष्टीनं 18 ते 44 वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करू शकलो, तर ते करता येऊ शकेल. पण एक नक्की आहे की केंद्र खूप कमी ठेवले, तर जास्त कालावधीसाठी लसीकरण सुरू राहील, असंही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

दरम्यान, ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना दुसरा डोस द्यावाच लागेल. तो पूर्ण करणं गरजेचं आहे. तर, लस उत्पादक कंपन्यांना 50 टक्के उत्पादन केंद्र सरकारला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आणि उरलेलं 50 टक्के राज्य सरकारं आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. खूप मागणी या दोघांकडेही आली, तर कुणाला प्राधान्य देणार? याविषयी सरकारला नियंत्रण आणावं लागेल का? असाही प्रश्न निर्माण होतो, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

Shree

पुणे हादरलं! आई-वडिल मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर 19 वर्षीय तरूणीवर घरात घुसून बलात्कार

‘परिस्थिती गंभीर होत चाललीये, आतातरी काहीतरी करा’; 100 शास्त्रज्ञांचं मोदींना पत्र

कोरोना झाला असतानाही रोहित सरदाना करत होते ‘ही’ महत्त्वाची मदत, शेवटचे तीन ट्विट चर्चेत!

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”

मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी कोरोनामुळे निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More