बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्राच्या नावावर काय खपवताय?’; राजेश टोपे संतापले

मुंबई | कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन राजकारण तापलं आहे राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल एवढात लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यावर पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.

महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करू नये असा टोला लगावला आहे आणि राज्य सरकारला केंद्राने किती लशी पुरवल्या याचा आकडा सांगितला आहे.

महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करु नये. आजपर्यंत राज्याला एकूण 1 कोटी 6 लाख 19 हजार 190 कोरोना लस देण्यात आल्यात. यापैकी 90 लाख 53 हजार 523 कोरोना लसी वापरण्यात आल्यात. त्यात 6 टक्के कोरोना लसी म्हणजेच 5 लिटर कोरोना लस वाया गेल्या. सध्या 7 लाख 43 हजार 280 कोरोना लस प्रक्रियेत आहेत. सध्या महाराष्ट्रात जवळपास 23 लाख कोरोना लसीचे डोस उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्राला जितक्या कोरोना लस वापरात आल्यात त्यापेक्षा अधिक लसींचा पुरवठा केला, असं जावडेकरांनी सांगितलं. याला आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा, असं राजेश टोपे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

अखेर कोब्रा कमांडोला नक्षलवाद्यांनी सोडलं, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

कोरोना लस घेणाऱ्यांसाठी खुशखबर; उबर कंपनी देणार फ्रि राईड

रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात आरोग्यमंत्र्यांचे उत्पादक कंपन्यांना ‘हे’ महत्वाचे आदेश

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More