बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजेश टोपे यांचं महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात मोठं वक्तव्य; वाचा सविस्तर

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील अनेक भागात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून लाॅकडाऊनचे संकेत दिले होते, पण आता त्यांनी महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात त्यांनी  एक मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात लाॅकडाऊन संदर्भात अजुन कोणताही निर्णय घेण्यात आला नसुन चर्चा ही त्याच दिशेने सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच लाॅकडाऊन हा अंतिम पर्याय ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता लाॅकडाऊन होणार अशा बातम्या माध्यमात प्रसारित झाल्या.

महाराष्ट्रातील जनतेनं जर नियमांचं पालन केलं आणि सोशल डिस्ट्न्सिंगचं योग्यरित्या पालन केलं तर कोरोनाचा संसर्ग वाढणारच नाही आणि परिणामी महाराष्ट्रात लाॅकडाऊन लावण्याची वेळ येणारच नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले की, 50 टक्के लाॅकडाऊनचाही कोणता निर्णय अजुन घेतला गेलेला नाही.

महाराष्ट्रात सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोना रोखण्यासाठी कडक आणि कठोर निर्बंंध लावणं अत्यंत गरजेचं असून त्या दृष्टीने सरकार येत्या 2 दिवसात नवी नियमावली जाहीर करेल असं राजेश टोपे यांनी सांगितलं. शिवाय अंतिमत: जिव वाचवण्यासाठी कडक लाॅकडाऊन हाच एक पर्याय सरकारकडे आहे आणि त्याचा आराखडा ही शेवटचा पर्याय म्हणुन बनवुन ठेवला जात आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

निवडणुकीच्या प्रचारात भाजपने केली ‘ही’ घोडचूक; चूक समजताच व्हिडीओ हटवला

‘त्या’ 27 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई?; विभागीय आयुक्तांचा निर्णय, महाजनांचा जीव टांगणीला!

परिणिती चोप्राचा टाॅपलेस बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले…

“भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

कोहलीच अव्वल! एकदिवसीय सामन्यात विराटची रँकिंग नंबर 1

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More