Top News

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे- राजेश टोपे

जालना | कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. आणि दुसऱ्या लाटेची शक्यता असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.

सरकारने घालून दिलेले नियम-अटी महत्त्वाच्या आहेत. मास्क वापरणं गरजेचं आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.

युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. या संदर्भातल्या बातम्या आपण ऐकतो आहोत. साहजिकच आपल्याकडे देखील कोरोनाची दुसरी लाट येईल का अशी चर्चा सुरु आहे. मात्र आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असं राजेश टोपे म्हणालेत.

दरम्यान, दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन टोपेंनी केलंय.

महत्वाच्या बातम्या-

“…तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही”

“मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काही राजकीय पक्षाचं षडयंत्र”

’14 वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले’; आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक गौप्यस्फोट

“खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा”

मी निवृत्त होतेय पण…- पी. व्ही. सिंधू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या