Top News

…तर राज्य सरकार गरिबांना मोफत लस देणार- राजेश टाेपे

मुंबई | केंद्राने गरिबांसाठी लस मोफत दिली नाही, तर राज्य सरकार ती मोफत देण्याचा विचार करेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

श्रीमंत लोक कोरोनाची लस पैसे देऊन घेऊ शकतात, पण गरिबांना ती मोफत द्यावी, अशी मागणी आपण 7 जानेवारी रोजीच्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असंही राजेश टोपे म्हणाले.

7 तारखेला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी माझी व्हीसीद्वारे बैठक आहे. गरिबांना लस मोफत द्या, अशी मागणी करणारे पत्र राज्याकडून केंद्राला पाठवलं जाईल. गरिबांसाठी 500 रुपयांचा खर्चही अधिक आहे. त्यांना मोफतच लस मिळाली पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले.

ब्रिटन स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळले. ते विलगीकरणात आहेत. ते ज्यांच्या संपर्कात आले होते त्यांचाही शोध घेतला जात आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

…तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे- गिरीश महाजन

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

पाटलांच्या गावात सोयीची आघाडी! भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी

कौतुकास्पद! अंधत्वावर मात करत लताने केलं कळसूबाई शिखर सर

“आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चं नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या