बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मुंबई आणि राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही. पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

सध्या रूग्णालयात बेड उपलब्ध आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याची गरज आहे. तसेच टॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या तीन सूत्रांवर काम करतोय. सर्व सामाजिक, शासकीय कामांना निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यू , लॉकडाऊन आहे, असंही राजेश टोपेंनी सांगितलं.

खासगी रूग्णालयात लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचे आदेश दिले आहेत. 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन देखील राजेश टोपेंनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सचिन वाझेंची प्रकृती खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं; ‘या’ बड्या नेत्याचं मंत्रिपद जाणार?

प्री-माॅन्सून सिझनला सुरवात; ‘या’ राज्यात पावसाची शक्यता

महापौर निवडणुकीआधीच जळगाव महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप?

मोठी बातमी! सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More