बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात एकाच दिवशी तब्बल 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लस; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्य सरकारकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. महाराष्ट्रात काल एका दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी या संदर्भात माहिती दिली आहे.

राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून गुरूवारी एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला आहे. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवशी तब्बल 57 हजार जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. तसेच मुंबईत देखील 50 हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. गुरुवारी 43183 नवीन रुग्णांची नोंद झाली. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,56,163 वर पोहोचला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘राहुल गांधी फक्त मुलींच्याच कॉलेजला भेट देतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण!

मुंबईतील लॉकडाऊनसंदर्भात किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ‘या’ बड्या खेळाडूनं वर्तवलं अशुभ भाकीत!

14 वर्षांचं प्रेम मात्र फक्त एक नकार आणि झाला रक्तरंजीत शेवट!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More