महाराष्ट्र मुंबई

कोरोना लस कधी येणार माहिती नाही, पण…- राजेश टोपे

मुंबई | लस कधी येणार ते माहिती नाही, पण राज्य सरकारकडून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व खबरदारी घेतली जात असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी लसीचा आढावा घेतला आहे. ती लस कधी येणार ते माहिती नाही. पण लस आली तर तिचं योग्य नियोजन सरकार करत आहे. कोल्ड स्टोरेज वाढवणं, त्याची साठवण क्षमता यावर सरकारची तयारी सुरु आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोना लस कुणाला द्यावी, त्याचं वर्गिकरण कसं व्हावं याचं संपूर्ण नियंत्रण केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे. प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

जलयुक्त शिवार योजना ही सर्वाधिक लोकप्रिय, मात्र सरकारकडून सूड बुद्धीने चौकशी- राम शिंदे

तिसऱ्या वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 303 रन्सचं आव्हान; पंड्या-जडेजाची अर्धशतकी खेळी

रेखा जरे हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही- संजय राऊत

“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या