बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

जालना | कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र वैज्ञानिकांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते जालन्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सध्या सण-उत्सवांमुळे होणाऱ्या गर्दीने पुन्हा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मात्र लसीकरणावर भर देत लसीकरणाची गती वाढवली तरी संक्रमण मोठ्या प्रमाणात होणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले. यावेळी बोलताना टोपेंनी आरोग्य सेवा विभागातील जागांबाबतही भाष्य केलं आहे.

गट ‘क’ आणि ‘ड’ या पदासाठी येत्या 25 आणि 26 तारखेला परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये काॅपीसारखे प्रकार होऊ नयेत म्हणून परीक्षा केंद्रांवर जॅमर बसवले जाणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे. राज्यात डेल्टा प्लस रूग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे मात्र तरीही सर्व नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करावं, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चंद्रकांत पाटील म्हणजे महाराष्ट्राला पटलेलं गोड स्वप्न- रूपाली चाकणकर

किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कोणी केली?, गृहमंत्री म्हणाले…

“बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत शुन्यापेक्षाही कमी

“काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील तर…”; काँग्रेसचं पाटलांना प्रत्युत्तर!

‘या’ 12 राज्यांनी देशाचं टेंशन वाढवलं; कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More