बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तोपर्यंत निवडणुका नकोच’; राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना | स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षणाच्या (OBC reservation) राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने (SC) स्थगिती दिल्यानंतर त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. भाजपने (BJP) या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आता महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. अशातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope Talk on OBC reservation) यांनी याविषयावर भाष्य केलं आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीने देखील भाजपच्या सुरात सूर मिसळल्याचं दिसतंय. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचं राजेश टोपे यांनी यांनी सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो पण ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक स्थगित कराव्यात. ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर निवडणुका घ्याव्यात, यामुळे कुणावर अन्याय होणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित कराव्यात. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घ्यावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

काय सांगता! फक्त 3 मिनिटात तब्बल 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं

“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना…”

ना बँडबाजा, ना वरात! जितेंद्र आव्हाडांच्या लेकीच्या लग्नाची एकच चर्चा

सुप्रिया सुळे म्हणतात,”माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की…”

आदित्य ठाकरेंचा Dream Project वादात; भाजपने केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More