मुंबई | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
गुरुवारी दिवसभरात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रात्री उशिरा राजेश टोपे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे भडकले, म्हणतात…
शिवजयंतीवर निर्बंध मग राष्ट्रवादीचा वशाटोत्सव अन् संमेलनावरही बंदी घाला- संभाजी ब्रिगेड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वशाटोत्सव, शरद पवार उपस्थित राहणार!
गजावरची कारवाई फक्त ट्रेलर, वेळीच सुधरा नाहीतर… ‘या’ अधिकाऱ्याचा इशारा
अर्जुनला विकत घेतल्यावर मुंबई इंडियन्स म्हणते, क्रिकेट त्याच्या रक्तात आहे!