बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या पोहोचली 49वर; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई|  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता 49वर पोहोचली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं असून सर्वांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

गेल्या 4 दिवसांमध्ये रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारी यंत्रणा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीनं पावलं उचलत आहे. सर्वांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी बाळगण्याची गरज आहे. असं ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

31 तारखेपर्यंतचे दहा दिवस खूप महत्त्वाचे आहेत फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं राजेश टोपेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे

दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोकल, बस या सगळ्यांची गर्दी कमी करा, दिलेल्या सुचनांचं पालन करा, लक्षण लपवू नका, घराच्या बाहेर पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना आवाहन  केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पेट्रोल 30 रुपये लिटर द्या, कॉंग्रेसची मागणी

“संपूर्ण सरकारी यंत्रणा जीवाची पर्वा न करता कोरोनाशी मुकाबला करतीय याचं मला समाधान आहे”

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार लॉक डाऊन का करत नाही?- पी. चिदंबरम

शिवरायांचा महाराष्ट्र किती लढवय्या आहे हे आपण साऱ्या जगाला दाखवून देऊ- मुख्यमंत्री

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More