बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

18 तारखेपासून दुकानं चालू करण्यासंदर्भात राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई |  राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चाललेला असताना अर्थव्यवस्थेचा देखील विचार करावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीववर चौथ्या लॉकडाऊनच्या काळात दुकाने चालू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट झोनच्या बाहेर दुकानं खुली करता येतील. त्यांना नियोजित वेळात हळुहळु 18 तारखेनंतर सुरू करता येतील. ऑरेंज आणि ग्रीन झोनध्ये याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार गाड्यांची खरेदी विक्री सुरू करता येईल रजिस्ट्रेशनची कामं सुरू करता येतील ज्यामुळे सरकारला आर्थिक स्त्रोत सुरू होईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 4 असणार आहे. कंटेनमेंट झोनबाहेर किती प्रमाणात काय खुलं करता येईल यावर मुख्यमंत्री आणि प्रशासकिय पातळीवर निर्णय घेतला जाईल. असं टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबईचं लॉकडाऊन लवकर उघडता येईल, असं सध्या तरी वाटतं नाही. कारण मुंबईचा कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतो आहे. आणि लॉकडाऊनचा फायदा होतो आहे. त्यामुळे आपण कोरोनाला ब्रेक लावण्यात यशस्वी ठरलो असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

‘सरकारला जाग कधी येणार?’; KEM रुग्णालयाचा व्हिडीओ पोस्ट करत राम कदमांचा सरकारला सवाल

महिलेच्या बाळंतपणात सुप्रिया सुळेंची मायेची ऊब, माहेरहून आईला आणण्यासाठी केली मदत

महत्वाच्या बातम्या-

मुंबईतील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

गुजरातमध्ये परप्रांतीय कामगारांचा पुन्हा उद्रेक; भरुचमध्ये पोलिसांवर दगडफेक

कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार- राजेश टोपे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More