बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजेश टोपेंची जनतेला कळकळीची विनंती; म्हणाले…

मुंबई | राज्यात रुग्णांची संख्या आता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातूून पत्राद्वारे महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोनायोद्धे, विशेषत: डाॅक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलिस आणि स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो, असं टोपे यांनी पत्राद्वारे सांगितलं आहे.

अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लागणार आहे. मी सध्या हाॅस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हाॅटस्पाॅटला भेटी दिल्या. परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही. पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र, आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे.

समजदार, संवेदनशील आणि सहकार्य करणारे लोक ही आपल्चा राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लाॅकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केेलेला आपण पाहिला. मात्र, आता पुन्हा लाॅकडाऊन परवडणारे नाही. लाॅकडाऊन टाळणे केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिलं की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लाॅकडाऊन टाळा.

दरम्यान, शेवटी स्वत:ची म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी आणि प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया कोरोनाला, एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने, असे आवाहन राजेश टोपे यांनी जनतेला केले आहे.

 

थोडक्यात बातम्या –

‘भारतासाठी खेळायचं त्याचं स्वप्न आता पूर्ण होईल’; इशानच्या आईवडिलांना अश्रु अनावर

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

…पण माझ्या शेतकऱ्यांसाठी मोदींचे अश्रू निघत नाहीत- सुप्रिया सुळे

‘या’ मुलाचा व्हिडीओ पाहून शंकर महादेवन म्हणाले…’एकदा तरी त्याला भेटण्याची संधी मिळो’

धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More