Rajeshwari Kharat | ‘फॅण्ड्री’ (Fandry Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टमुळे ती मोठ्या चर्चेत आली असून, यावेळी ती तिच्या नव्या धार्मिक प्रवासामुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर घोषणा-
राजेश्वरीने (Rajeshwari Kharat) आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती दिली. त्या फोटोत ती पाण्यात उभी असून, हात जोडलेले दिसत आहेत. या चित्रासोबत तिने “बाप्तिस्मा स्वीकारलं” असं लिहिलं आहे. याचबरोबर तिने एक ग्रुप फोटो देखील शेअर केला असून, त्यात ती काही लोकांसह दिसून येते.
View this post on Instagram
तिच्या पोस्टमध्ये बायबलमधील एक विधान देखील नमूद केलं आहे – “परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहेत.” तसेच, तिने “#NewBeginning” आणि “#Baptized” हे हॅशटॅग वापरून आपल्या नव्या जीवनाची सुरुवात कशी आहे, हे स्पष्ट केलं आहे. या सगळ्या पोस्टवरून हे स्पष्ट होतं की, राजेश्वरीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे.
चाहत्यांमध्ये नाराजीची भावना-
राजेश्वरीच्या (Rajeshwari Kharat) या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक युजर्सनी तिच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटलं, “ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करण्याऐवजी भारतीय आणि सुंदर असा बुद्धांचा धम्म असतानाही तुला दुसऱ्या धर्माची गरज भासावी हे दु:खद आहे. बाबासाहेबांनी २५ वर्षे अभ्यास करून जे सांगितलं, त्याचा काही अर्थच राहिला नाही.”
इतर काहींनी तीव्र शब्दांत टीका करत “काळी चिमणी गेलीस” अशा प्रकारच्या टीका केल्या आहेत. बर्याच चाहत्यांनी तिच्या निर्णयावर नाराजी दर्शवली असून, काहींनी तिला अनफॉलो केल्याचीही माहिती दिली आहे.