Top News मुंबई

राजगृह तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी केली दुसरी मोठी कारवाई

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर हिंदू कॉलनीतील राहगृह निवासस्थानात झालेल्या तोडफोड प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आलीये. 20 वर्षीय विशाल मोरे असं या आरोपीचं नाव आहे.  विशाल मोरे हा आरोपी कल्याणला राहणारा असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याचा साथीदार उमेश जाधव याला अटक केली होती.

राजगृहावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आधी उमेश सीताराम जाधव या आरोपीला अटक केली होती. उमेश दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होतं. याच्या आधारावर पोलिसांनी शोध घेऊन उमेश याला अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. आता मुख्य आरोपी कचाट्यात सापडल्याने या हल्ल्यामागचं कारण उघड होण्यास मदत होणारे.

8 जुलै रोजी हिंदू कॉलनीमधील राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची, कुंड्यांची नासधूस करण्यात आली होती. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत राजगृहाच्या काचांचं नुकसान झालं होतं. तसंच सीसीटीव्ही कॅमेरा फोडून हल्लेखोरांनी पळ काढला होता. माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईत जातीने लक्ष घातलं.

राजगृहवरील हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यानंतर एका व्हीडिओच्या माध्यमातून सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. पोलिसांच्या तपासावरही त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन….. ‘या’ भागामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता!

राज्यात कोरोनाचा हाहाकार…. काल दिवसभरात वाढले तब्बल एवढे हजार कोरोना रूग्ण

स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूदने उचललं मोठं पाऊल

‘वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य

समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे, ‘स्व’-रुपवर्धिनीचे ज्ञानेश पुरंदरे यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या