बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रजनीकांत यांनी राजकारणाला ठोकला कायमचा रामराम; पक्षही केला बरखास्त!

मुंबई | दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणात न येण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. रजनी मक्कल मंद्रम हा त्यांचा पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. राजकारणातून बाहेर पडत आता एनजीओमार्फत लोकांची सेवा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

रजनी मक्कल मंद्रम या त्यांच्या संघटनेच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. भविष्यातही आपला राजकारणात येण्याचा विचार नाही, असं रजनीकांत यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर आपली रजनी मक्कल मंद्रम ही संघटनाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी रजनीकांत यांनी एक पत्रक जाहीर केलं आहे.

मी राजकारणात प्रवेश करावं की, नाही यावर आम्ही चर्चा करू. कोविड, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो’, असंही रजनीकांत यांनी फोरमच्या सदस्यांसोबत बैठकीपूर्वी सांगितलं.

दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. रजनीकांत यांनी केलेल्या घोषणेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“पटोलेंनी स्वबळाची घोषणा केल्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरे भरले आहे”

…..म्हणून केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलची ‘ब्लू टिक’ हटवली

“योग्य माहिती अभावी नाना पटोलेंनी आरोप केले; सुरक्षा नको असेल तर तसं सांगावं”

शिवसेना नेते संजय राऊत रॉकस्टार- उर्मिला मातोंडकर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर नाना पटोलेंनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More