नवी दिल्ली | सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात अधिकृतपणे उतरण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. बरेच दिवस चर्चा चालू होती की रजनीकांत निवडणूक लढवणार की नाही?, मात्र आता राजकीय चर्चांणा पुर्णविराम मिळाला आहे.
मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून याबाबतची घोषणा 31 डिसेंबरला करणार असल्याचं रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तामिळनाडूमध्ये 2021 मध्ये एप्रिल-मे मध्ये विधानसभेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वारे वाहायला सुरूवात झाली आहे. रजनीकांत यांनी डिसेंबर 2017 मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान, अभिनेता रजनीकांत आणि कमल हसन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी वृत्त समोर आली होतीत.
A political party will be launched in January; Announcement regarding it will be made on December 31st, tweets actor Rajinikanth pic.twitter.com/K2MikOk30I
— ANI (@ANI) December 3, 2020
महत्वाच्या बातम्या-
“धुळे नंदुरबारच्या निकालावरून महाविकास आघाडीचे उद्याचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होतं”
राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कुणाकडे?; शरद पवार यांनी सांगितली ‘ही’ तीन नाव
“सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही”
“योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली”
‘पुढील सात दिवसांत वृद्धेची माफी न मागितल्यास….’ ; आंदोलक शेतकरी महिलेची थट्टा पडणार महागात