देश

‘राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलंय’; ‘या’ भाजप खासदाराचा घरचा आहेर

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिरासाठी कोणतंही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचं झालं तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव घ्यावं लागेल, अशा शब्दांत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

टीव्ही 9 भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी हे वक्तव्य केलं आहे. या चर्चेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

र्चेदरम्यान, त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आणखी कोणाकोणाला निमंत्रण द्यायला हवं होतं, ज्यांना देण्यात आलेलं नाही. यावर राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं कोणतंही योगदान नाही. यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणं सरकारच्यावतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, ज्यामुळं हे सांगता येईल की राम मंदिर उभारलं जात आहे, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय.

राम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही- जितेंद्र आव्हाड

‘…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही’; अंकिता लोखंडेने सोडलं मौन

अभिनेता आफताब शिवदासानी झाला ‘बाप’माणूस!

पुणे विभागीय आयुक्तपदी सौरव राव यांची नियुक्ती

मी कृषीमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्यांवर…, एकनाथ खडसेंचा ठाकरे सरकारवर प्रहार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या