मोठी बातमी! राजीव गांधींच्या मारेकऱ्याची तब्बल 31 वर्षांनंतर जेलमधून सुटका
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या दोषी एजी पेरारीवलन (AG Perarivalan) याची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 अन्वये विशेष अधिकारांतर्गत पेरारीवलनच्या सुटकेचा निर्णय दिला आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या दयेचा अर्ज प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
पेरारीवलन याची सध्या जामीनावर सुटका झाली आहे. आपण 31 वर्षांपासून तुरूंगात आहोत त्यामुळे आता सुटका व्हावी, असा अर्ज पेरारीवलनने सर्वोच्च न्यायालयात केला होता. त्यानंतर आता तब्बल 31 वर्षांनंतर पेरारीवलनची जेलमधून सुटका झाली आहे.
दरम्यान, राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरल्यानंतर पेरारीवलन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 31 वर्षांपासून पेरारीवलन शिक्षा भोगत असून त्यांचे आचरण योग्य आहे व त्यांची जेलमधून सुटका झाली पाहिजे, असा युक्तिवाद पेरारीवलनच्या वकिलांनी केला होता. त्यानंतर आता एजी पेरारीवलनची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
देशभर गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर!
हार्दिक पटेल यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप, म्हणाले…
काँग्रेसला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
Comments are closed.