देश

“राम मंदिराची निर्मिती करणं हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं स्वप्न होतं”

भोपाळ | मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राम मंदिर उभारणीसाठी जमेल तेवढा निधी देण्याची विनंती करणारे पोस्टर्स माजी पंतप्रधान राजीव गाधींच्या फोटोसह झळकले आहेत.

राम मंदिराची निर्मिती करणं हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं स्वप्न होतं. त्यासाठी आपण निधी द्यावा असं लिहिलेलं आहे.

काँग्रेससुद्धा राम मंदिरासाठी स्वतंत्रपणे निधी उभारत असल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या जवळचे आमदार पी. सी. शर्मा यांनी निधी उभारणी सुरु केली आहे.

पी. सी. शर्मा यांनी यासाठी राजीव गांधी यांचा 1989 मधील फोटोचा वापर केलाय. या फोटोमध्ये 1989 साली राजीव गांधी अयोध्या येथील राम मंदिराचं भूमिपूजन करताना दिसत आहेत. या अकऊंटमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी निधी द्यावा करावे असे आवाहन पी. सी शर्मा यांनी पोस्टरच्या माध्यमातून केला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष फायटर असावा- विजय वडेट्टीवार

आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा- सुप्रिया सुळे

काहीही झालं तरी मी दिल्लीत आंदोलन करणारच- अण्णा हजारे

मुलाच्या सततच्या पैशांच्या मागणीला जन्मदात्री वैतागली; उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल

मंत्रालयात शॉर्ट सर्किटमुळे वीज पुरवठा खंडित; अनेक मंत्र्यांच्या दालनात अंधार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या