बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजीव सातव हे उभरतं नेतृत्व, मी संसदेतील चांगला मित्र गमावला”

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार राजीव सातव यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. नुकतेच राजीव सातव यांच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सातव यांचं निधन झाल्यामुळे दु:ख व्यक्त केलं आहे.

राजीव सातव हे उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या जाण्याने मी संसदेतील चांगला मित्र गमावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.

राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.

दरम्यान, 19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना रुग्णाचा मृतदेह प्लॅस्टिकमधून काढणं आलं अंगलट, आता सारं गाव भोगतंय सजा!

भयंकर ! धुम्रपान करतानाच गाडीत सॅनिटायजर वापरलं; अन् झालं असं काही…, पाहा व्हिडीओ

व्यावसायिकासोबत शरीरसंबंध ठेवताना काढला व्हिडीओ, त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

5 महिने एकत्र राहून ठेवले शरीरसंबंध, त्यानंतर… अत्यंत धक्कादायक प्रकार समोर

हास्यास्पद ! पावसात रस्त्याच्या कडेला मोबाईल पाहत जात होता; अन् घडलं असं काही…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More