राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातवांचा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई | काँग्रेसचे दिवंगत आमदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) या काल कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे दौऱ्यावर होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने मागून येऊन हल्ला केला, अशी माहिती प्रज्ञा सातव यांनी ट्विटरद्वारे दिली.

आज माझे पती राजीव भाऊ नाहीत. मुले लहान आहेत. मी कुणाचंही वाईट केलेलं नाही. माझ्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी बोलताना प्रज्ञा सातव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर हा झालेला हा हल्ला पहिला नसून हा दुसरा हल्ला असल्याचा गौप्यस्फोट प्रज्ञा सातव यांनी केला आहे.

सातव यांनी याआधी देखील हल्ला झाल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेदरम्यान, अशा प्रकारचा हल्ला झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आम्ही त्यावेळी फार सिरियसली घेतलं नाही. पण सलग दुसरी घटना घडल्यानंतर आम्ही पोलिसात तक्रार द्यायचा निर्णय घेतल्याचं सातव यांनी सांगितलं.

दरम्यान, आम्ही आमच्या पक्षाचं काम ताकदीने करतोय. हल्ल्यानंतर घाबरून घरात बसणार नाही माझे दौरे सुरू राहतील, असं वक्तव्य प्रज्ञा सातव यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More