जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘पत्नी’; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘पत्नी’; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

मुंबई | शिक्षण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. अकरावीच्या संस्कृत सरिता या पुस्तकात जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांची ‘पत्नी’ असा केला आहे.

संस्कृत सरिता हे पुस्तक रवींद्र शास्त्री महाराज यांनी लिहिलं आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका होताना दिसून येत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत सामाजिक संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे. तसेच हे पुस्तक तातडीने रद्द करावं आणि वितरकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. 

दरम्यान, अभ्यासक्रमात खोटी माहिती छापण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

महत्वाच्या बातम्या 

-राफेल कराराबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

-निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर आणि….

-राहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केलं- मा. गो. वैद्य

-मोदींची जात दाखवत सचिन पायलट यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी

-मोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप खासदार गैरहजर

 

Google+ Linkedin