Rajmata Jijau Punyatithi 2024 | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची आज 17 जुन रोजी, तारखेप्रमाणे पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय नेत्यांनी अभिवादन केलं आहे. तसंच महाराष्ट्र शासनाकडूनही अभिवादन पोस्ट करण्यात आली आहे.
मात्र, ही पोस्ट करताना राज्याच्या महसूल विभागाकडून एक मोठी चूक झाली आहे. महसूल विभागाने पुण्यतिथी असताना जयंतीची अभिवादन पोस्ट केली आहे. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात येत आहे.
महसूल विभागाचा गजब कारभार
“हिंदवी स्वराज्याचे बीज छत्रपती शिवरायांच्या मनात रोवून त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती निर्माण करणाऱ्या स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!”, असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. मात्र, फोटोमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन असं लिहिण्यात आलं आहे.
हिंदवी स्वराज्याचे बीज छत्रपती शिवरायांच्या मनात रोवून त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती निर्माण करणाऱ्या स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!#RajmataJijabai #JaiBhavani pic.twitter.com/cyEep62XJB
— Revenue Department, Government of Maharashtra (@maharevenue) June 17, 2024
यामुळे राज्याच्या महसूल विभागाच्या गजब कारभाराची एकच चर्चा रंगत आहे. नागरिकांकडून देखील यावर संताप व्यक्त केला जात आहे. नेटकरी देखील त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. ‘आज जयंती नसून आईसाहेब जिजाऊ यांची पुण्यतिथी आहे. महसूल विभागास कोणतेच काम व्यवस्थित करता (Rajmata Jijau Punyatithi 2024) येत नाही.’, असा संताप एका नेटकऱ्याने केला आहे.
जिजाऊंच्या पुण्यतिथीला जयंतीचं अभिवादन केल्याने संताप
काही नेटकऱ्यांनी या पोस्टवरून आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही टार्गेट केलं आहे. विखे-पाटील हे सध्या महसूल विभाग कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याच्या महत्वाच्या विभागाकडून अशी चूक झाल्याने संताप व्यक्त केला जातोय.
दरम्यान, राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली जिजाऊंनी (Rajmata Jijau Punyatithi 2024) रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला.
News Title – Rajmata Jijau Punyatithi 2024
महत्त्वाच्या बातम्या
तरुणांनो बारमध्ये दारु पिण्यासाठी द्यावा लागणार हा पुरावा!
राज्यातील ‘या’ जिल्ह्याला यलो अलर्ट; तर इतर जिल्ह्यात कसे असणार वातावरण
ओबीसी समाज एकवटला; 57 लाख बोगस कुणबी नोंदी तातडीने रद्द करा,अन्यथा…
महाराष्ट्रात एनडीएला कमी जागा का मिळाल्या? रामदास आठवलेंनी केला मोठा दावा
…म्हणून महाविकास आघाडीला यश मिळाले; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण