बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजमौलींच्या ‘RRR’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्याच दिवशी मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड

मुंबई | एस एस राजमौली (SS Rajmouli) यांच्या बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. त्यानंतर आता राजमौली यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. राजमौलींच्या या चित्रपटालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

राजमौली यांचा ‘RRR’ चित्रपट 25 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होऊन 24 तासातच बंपर कमाई केली आहे. ‘RRR’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाच्या कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे.

RRR चित्रपटाने रिलीजच्या दिवशीच तब्बल 125 कोटींची दमदार कमाई केली आहे. पहिल्या दिवसाची कमाई बघता आगामी काळात या चित्रपटाची कमाई अनेक पटींनी वाढणार आहे. या चित्रपटाच्या कमाईचा अंदाज रिलीजच्या आधीच वर्तवण्यात आला होता.

दरम्यान, आलिया भट, रामचरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण यासारखी तगडी स्टार कास्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाचं कथानक आणि दमदार अॅक्शन सीन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. कमाईच्या बाबतीत राजमौलींच्या RRRने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊतांचं ‘हे’ वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे”

“एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावं, कोणाचीही नोकरी जाणार नाही”

“कोरोनापेक्षा सध्या सुरू असलेलं राजकारण भयंकर”

महागाईचा फटका, पाच दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं, वाचा ताजे दर

पोस्टाची भन्नाट योजना, ‘इतक्या’ वर्षात तुमचे पैसे होतील डबल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More