बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महात्मा गांधीजींनंतर या देशातील जनतेचे मन कोणी समजून घेतले असेल, तर ते…”, राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली | महात्मा गांधींनंतर (Mahatma Gandhi) या देशात भारतीयांचे मन कोणी समजून घेतले असेल, तर ते नरेंद्र मोदींनी (Narendra Modi), असा मोठा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.

ज्येष्ठ पत्रकार अजय सिंग (Ajay Singh) लिखीत द आर्किटेक्ट ऑफ द न्यू बीजेपी: हाऊ नरेंद्र मोदी ट्रान्सफॉर्म्ड पार्टी (The Architect of the new BJP: How Narendra Modi Transformed Party?) या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. नरेंद्र मोदींनी भाजपला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले, असे सिंह म्हणाले.

देशातील अनेक पक्ष आज भाजपला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणालाही ते शक्य नाही. स्वतंत्र भारतात दिलेला शब्द पाळणारे, नरेंद्र मोदी एकमेव नेते आहेत, असेही राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More