Top News देश

कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही- राजनाथ सिंह

नवी दिल्ली | केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेले अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या कायद्यांना देशभरातून शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. अशातच देशाते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ते बोलत होते.

शेतकऱ्यांची जमीन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमाने हिसकावली जाईल, असा खोटा प्रचार करण्यात आला आहे. कुणीही मायचा लाल शेतकऱ्यांपासून त्याची जमीन हिसकावू शकत नाही. अशी संपूर्ण व्यवस्था कृषी कायद्यात करण्यात आली आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

किमान आधारभूत किंमत नष्ट करण्याचा या सरकारचा हेतू कधीही नव्हता, ना आहे, ना कधी असेल. मंडी व्यवस्थाही कायमच राहणार असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, जे लोक शेतकऱ्यांच्या नावावर आपला व्यक्तीगत स्वार्थ साधत होते, त्यांचा धंदा नष्ट होईल, यामुळेच ते देशाच्या एका भागात जाणूनबुजून अफवा पसरवत आहेत, असं राजनाथ सिंह म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस

‘गो कोरोना गो’ नंतर रामदास आठवलेंनी तयार केलं नवं स्लोगन!

“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”

अॅमेझॉननंतर मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे; पत्रकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी

‘…की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा’; केंद्रीय मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या