Top News देश

“योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो”

नवी दिल्ली | केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतूक केलं आहे. आजतक या वाहिनीच्या ‘सीधी बात’ या कार्यक्रमात ते सहभागी झाली होते.

मी कोणाचीही तुलना करू इच्छीत नाही. परंतु मी योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली.

योगी आदित्यनाथ हे प्रत्येकाच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांनी आपलं जीवन जनतेसाठी समर्पित केलंय. त्यांची उत्तर प्रदेशातील कामगिरी उत्तमच असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी एनडीएतून शिवसेना बाहेर पडण्यावर राजनाथ सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, काही नवे पक्ष येतात काही जातात. जर कोणत्या पक्षाला आपल्या युती धर्माचं पालन करता येतं तर तो भाजप आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सर तुम्ही पेलाय’! गाडीला धडकी दिली म्हणून मांजरेकरांनी मारली चाप

“औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात एकपण शहर नको, ही शिवभक्ती म्हणा नाहीतर इतिहासाचा भान”

“मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेसचा नामांतराला विरोध”

“केंद्रीय मंत्री किंवा सरकारमधील कोणत्या नेत्याने लस का टोचून घेतली नाही”

…म्हणून पुढचे 2 दिवस मुंबईसह राज्यात कोरोना लसीकरण बंद राहणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या