बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अपघात नेमका कसा घडला?’, राजनाथ सिंगांनी लोकसभेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

नवी दिल्ली | देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालं. जनरल बिपीन रावत यांचा अपघात नेमका कसा घडला, ही दुर्घटना नक्की कशी घडली याचा संपूर्ण घटनाक्रम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदेत बोलताना सांगितला आहे.

जनरल बिपीन रावत हे भारतीय सैन्याच्या IAF MI 17 या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टरने कुन्नुर एअरबेसवरून 12 वाजता उड्डाण घेतलं. साधारण 12 वाजून 15 मिनिटांनी हेलिकॉप्टर वेलिंग्टन एअरबेसला उतरणार होतं, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. (IAF MI 17 Helicopter Crash)

हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर 12 वाजून 8 मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कुन्नुर जवळ काही स्थानिकांना आग लागल्याचं दिसल्याने त्यांनी तिथे धाव घेतली. तेव्हा मिलिट्री हेलिकॉप्टरच्या अवशेषांना आग लागलेलं त्यांना दिसली, असं सिंह म्हणाले.

यानंतर स्थानिक प्रशासनाकडून तातडीनं मदत कार्य करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं. जेवढ्यांना शक्य होतं तेवढ्यांना त्या हेलिकॉप्टरच्या अवशेषातून बाहेर काढण्यात आलं. हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

बिपीन रावत यांच्या अपघातापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

CDS बिपीन रावतांच्या निधनावर पाकिस्तानने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

3 मिनीटांत 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या भारतीय CEOनं अखेर माफी मागितली, म्हणाले…

CDS जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर CDS पदासाठी ‘या’ मराठमोळ्या नावाची चर्चा

Omicronच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More